Samsung Galaxy : सॅमसंगचा 70 हजाराचा 5G फोन मिळत आहे निम्म्या किंमतीत; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ऑफर…

Content Team
Published:
Samsung Galaxy S21 FE 5G

Samsung Galaxy : दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगचे फोन्स भारतामध्ये खूप लोकप्रिय आहेत. सॅमसंगच्या फोन्सना बाजरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सॅमसंग प्रत्येक श्रेणीतील मोबाईल फोन्स ऑफर करते. 

अशातच मागील वर्षी सॅमसंगने परवडणाऱ्या किंमतीत Samsung Galaxy S21 FE 5G लॉन्च केला होता. हा जबरदस्त फोन 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. जो आता तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. तुम्ही म्हणत असाल हा फोन इतका स्वस्त कुठे मिळत आहे? तर चला या फोनवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल जाणून घेऊया…

सॅमसंगचा फॅन एडिशन स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE 5G ग्राहक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून मोठ्या सवलतीत ऑर्डर करू शकतात. हे डिव्हाइस त्याच्या लॉन्च किमतीच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. या फोनवर ग्राहक स्वतंत्रपणे बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटचा देखील लाभ घेऊ शकतात.

Samsung Galaxy S21 FE 5G

सॅमसंगच्या फॅन एडिशन स्मार्टफोनची क्वालकॉम प्रोसेसर आवृत्ती भारतात 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. संपूर्ण 57 टक्के डिस्काउंटनंतर, Flipkart ने आता हा फोन 29,999 रुपयांना लिस्ट केला आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह बेस व्हेरियंटला निवडक बँक कार्डद्वारे पेमेंटवर अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील मिळतो.

जर एखाद्या ग्राहकाने आपला जुना फोन एक्सचेंज करताना हे खरेदी केले तर त्याला जास्तीत जास्त 20,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज डिस्काउंटचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. अशातच हा फोन तुम्ही अगदी कमी किंमतीत घरी आणू शकाल.

Galaxy S21 FE 5G ची वैशिष्ट्ये

सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.4-इंचाचा HD डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. मजबूत कामगिरीसाठी, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. Android 13 वर आधारित OneUI सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, फोनच्या मागील पॅनलवर 12MP 12MP 8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. 32MP सेल्फी कॅमेरा असलेल्या डिव्हाइसची 4500mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe