Samsung Galaxy : दक्षिण कोरियातील स्मार्टफोन निर्माता सॅमसंग लवकरच आपले दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या वर्षाच्या अर्ध्यात Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip लॉन्च करू शकते.
लॉन्चपूर्वी कंपनीच्या या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन्सबद्दल काही नवीन लीक समोर आले आहेत. मागील काही वर्षापासून फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री वाढली आहे. या विभागात सॅमसंग पहिल्या स्थानावर आहे. अशास्थितीत आगामी स्मार्टफोन्सकडून कपंनीच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
कपंनीच्या या स्मार्टफोन्सना चीनच्या कंपल्सरी सर्टिफिकेशन (3C) वेबसाइटवरून प्रमाणपत्र मिळाले आहे. या सूचीवरून त्यांचा चार्जिंग सपोर्ट दिसून येतो, जो कंपनीच्या Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 मधील चार्जिंग सपोर्ट सारखा आहे. या सूचीनुसार, हे स्मार्टफोन Samsung EP-TA800 चार्जरसह येतील जे 25 W वायर्ड चार्जिंगसाठी समर्थन दर्शवतील.
अलीकडे, टिपस्टर Revegnus (@Tech_Reve) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये सांगितले होते की Galaxy Z Flip 6 मध्ये Exynos 2400 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या Galaxy S20 आणि Galaxy S24 मध्ये समान प्रोसेसर होता. Samsung ने Galaxy S24 Ultra मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर म्हणून दिला होता. फॅन-आउट वेफर लेव्हल पॅकेज (FOWLP) वापरणारा हा कंपनीचा पहिला प्रोसेसर आहे.
याआधी काही लीक्समध्ये असे सांगण्यात आले होते की Galaxy Z Flip 6 लाईट ब्लू, लाइट ग्रीन, यलो आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. हा फोन मार्केटमध्ये कधी पर्यंत येईल याबाबत कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. तसेच त्याच्या किमतींबाबतही कोणती माहिती समोर आलेली नाही.