SIM Card Rule : जाणून घ्या सिम कार्डचा ‘हा’ नियम, नाहीतर तुम्हाला भरावा लागेल 10 लाखांचा दंड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIM Card Rule : बाजारात रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल अशा कंपन्यांच्या सिम कार्डची विक्री केली जाते. अनेकांकडे एकच सिम कार्ड असते, तर अनेकांकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतात.

जर तुम्ही नवीन सिम खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण आता सिम कार्डचा नवीन नियम लागू केला जाणार आहे. जर तुम्ही या नियमाचे चुकूनही उल्लंघन केले तर तुम्हाला तब्बल 10 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी हा नियम एकदा जाणून घ्याच. तुम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.

या दिवसापासून लागू होणार सिम विक्रीसाठी नवीन नियम

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता सिम विक्रीचे नवीन नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. तुम्हाला 10 ऑक्टोबरनंतर रस्त्याच्या कोणत्याच कोपऱ्यावर सिम कार्डची विक्री करणारे लोक सहजासहजी पाहायला मिळणार नाहीत. कारण आता सिम कार्ड विकणाऱ्या लोकांना सिम विकण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्याची योजना आहे. इतकेच नाही तर सिम खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

परवान्यासाठी आवश्यक कागदपत्र

10 ऑक्टोबरनंतर सिम विकल्याप्रकरणी संबंधीत ऑपरेटरची चौकशी करण्यात येईल. त्यांना आता फ्रँचायझी घेण्यासाठी परवाना गरजेचा असणार आहे. ज्यांच्याकडे वैध सरकारी कागदपत्रे असतील केवळ त्याच लोकांना परवाना घेता येणार आहे. तसेच यासाठी कॉर्पोरेट ओळख क्रमांक, आधार कार्ड आणि पासपोर्टही दिले जाणार आहे. शिवाय त्यांना ई-केवायसी आणि पोलिस व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे.

युनिक आयडी

एवढेच नाही तर सिम विक्रेत्यांना एक अद्वितीय PoS ID जारी करण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला ट्रायच्या अधिकृत वेबसाइटवर जाणून अर्ज करता येईल. तसेच नवीन सिम कार्ड नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले तर त्यांचे PoS आयडी ब्लॉक होण्याची शक्यता आहे.