Smart TV Offer : ब्रँडेड स्मार्ट टीव्ही 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार! मिळेल एक्सचेंज ऑफरही

Pragati
Published:
Smart TV Offer

Smart TV Offer : अलीकडच्या काळात स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्याही आपले वेगवेगळे फीचर्स असणारे टीव्ही लाँच करू लागल्या आहेत. ज्याच्या किमतीही खूप जास्त आहेत.

परंतु आता तुम्ही कमी किमतीत Xiaomi आणि Infinix स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. फ्लिपकार्टवर अशी शानदार ऑफर मिळत आहे. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. जाणून घ्या सविस्तर ऑफर.

Mi 4A 32 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही ऑफर

किमतीचा विचार केला तर Xiaomi चा हा TV 14,999 रुपयांच्या मूळ किमतीसह येतो. त्याशिवाय यावर कंपनी एकूण 33 टक्के सवलत देत आहे. या सवलतीनंतर तुम्ही हा कंपनीचा टीव्ही फक्त 9,999 रुपयांना खरेदी करता. तर बँक डिस्काउंटसह या स्मार्ट टीव्हीची किंमत आणखी 500 रुपयांनी कमी करता येते.

इतकेच नाही तर या टीव्हीवर 1400 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या टीव्हीमध्ये तुम्हाला 32 इंच HD रेडी डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या शानदार स्मार्टटीव्हीचे ध्वनी आउटपुट 20 वॅट्स पर्यंत आहे.

Infinix X3IN 32 इंच HD रेडी LED स्मार्ट Android TV 2023 एडिशन (32X3IN) ऑफर

किमतीचा विचार केला तर या स्मार्टटीव्हीची मूळ 10,999 रुपये इतकी आहे. हे 47% डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करता येईल. तसेच तुम्ही बँक ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 500 रुपयांनी कमी करू शकता. त्याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये या टीव्हीची किंमत 1400 रुपयांनी कमी करता येईल.

या स्मार्ट टीव्हीमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 32-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात शक्तिशाली आवाजासाठी 20 वॅट्सचे ध्वनी आउटपुट दिले आहे.

थॉमसन अल्फा 32 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही 2022 एडिशन (32Alpha007BL) ऑफर

या थॉमसन टीव्हीची मूळ किंमत 14,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही 33% डिस्काउंटनंतर हा टीव्ही अवघ्या 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीवर 500 रुपयांपर्यंत अतिरिक्त बँक सवलत मिळत आहे. शिवाय एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही या स्मार्ट टीव्हीची किंमत 1400 रुपयांनी कमी करता येईल. हा टीव्ही 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्यात देण्यात आलेले 30 वॅट साउंड आउटपुट घरबसल्या थिएटरची मजा देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe