Smartphone Tips : तुम्हीही खराब मोबाईल नेटवर्कमुळे त्रस्त आहात का? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, कधीच जाणार नाही सिग्नल

Pragati
Published:
Smartphone Tips

Smartphone Tips : सध्याच्या काळात स्मार्टफोन सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. परंतु अनेकदा स्मार्टफोनमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने कित्येक महत्वाच्या कामात खूप अडचणी येतात. सतत स्मार्टफोनचे नेटवर्क जात असल्याने त्यांना कित्येक वेळा महत्वाचे कॉल्स करता येत नाही.

तुम्ही अगदी देशातील अग्रगण्य नेटवर्क वापरात असाल तरी अनेकवेळा अशी समस्या येते. अशातच आता तुम्हीही स्मार्टफोनच्या नेटवर्कच्या सततच्या जाण्या- येण्यामुळे वैतागला असाल तर काळजी करू नका. तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमच्या फोनचा सिग्नल कधीही जाणार नाही.

सॉफ्टवेअर अपडेट

अनेक वेळा सॉफ्टवेअर अपडेट नसेल तरी ही समस्या निर्माण होते. त्यावेळी तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर Software Update/About Phone मधून जो पर्याय उपलब्ध दिसेल त्यावर क्लिक करणे गरजेचे आहे. त्यानंतर डाउनलोड आणि स्थापित वर टॅप करा, आता तुमचा फोन रीस्टार्ट केला जाईल. असे केले तर तुमची नेटवर्कची समस्या दूर होईल.

करा एअरप्लेन मोड चालू

फोनला एअरप्लेन मोडवर ठेवले तर तुमच्या फोनचे सेल्युलर डेटा नेटवर्क रीस्टार्ट होते. त्यासाठी तुम्हाला फक्त सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट / कनेक्शन आणि शेअरिंगवर जा. त्या ठिकाणी एअरप्लेन मोड चालू करा. आता तुमच्या फोनची स्क्रीन खाली स्वाइप करा. या ठिकाणीही तुम्हाला एअरप्लेन मोड दिसेल. तेथून तुम्ही ते चालू करू शकता.

फोन रीस्टार्ट

समजा तुमच्या फोनचा एअरप्लेन मोड काम करत नसेल तर तुमचा फोन रीस्टार्ट करा. हे फोनच्या सेटिंग्ज रीस्टार्ट करते. समजा काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतात. त्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटण दाबून धरावे लागणार आहे. फोन रीस्टार्ट होईल.

सिम साफ करा

तुम्हाला सिम कार्ड साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा फोन रिस्टार्ट करूनही काम होत नाही, तर सिममध्येच काही समस्या येतात. त्यावेळी तुम्हाला फोनचे सिम काढून मऊ कापडाने स्वच्छ करावे लागणार आहे. यासाठी फोन बंद करून सिम ट्रेमधून सिम काढा. आता ते एका स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. आता ते सिम पुन्हा फोन मध्ये ठेवा. यानंतरही नेटवर्क येत नसेल तर तुम्ही सिम कार्ड बदलू शकता.

नेटवर्क सेटिंग्ज करा रीसेट

अनेकदा नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करणे गरजेचे असते, त्यामुळे तुमच्या फोनची समस्या दूर होते. जर तुम्ही या सेटिंग्ज रीसेट केल्या तर तुमचा डेटाची हानी होणार नाही. त्यासाठी सर्वात अगोदर सेटिंगमध्ये जाऊन सिस्टम/जनरल मॅनेजमेंटमधून जे काही उपलब्ध आहे त्यावर टॅप करावे. आता रीसेट करा आणि WiFi, मोबाइल रीसेट करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe