Smartphones Sale : सेल सेल.. कमी बजेटमध्ये खरेदी करा महागडे स्मार्टफोन्स, मिळतात दमदार वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphones Sale : जर तुम्ही महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही iQOO चे स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. अशी धमाकेदार ऑफर तुमच्यासाठी कंपनीनेच आणली आहे.

ज्याचा लाभ घेऊन तुम्ही iQOO Z7s,iQOO Neo 7 5G,iQOO Neo 7 Pro 5G,iQOO 11 5G तसेच iQOO Z6 Lite 5G हे फोन खरेदी करू शकता. विशेष म्हणजे यात कंपनीने दमदार फीचर्स दिली आहे. त्यामुळे कमी किमतीत शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका. पहा ऑफर.

iQOO Z7s

तुम्हाला आता हा स्मार्टफोन 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनची मूळ किंमत 23,999 रुपये इतकी आहे. तर ICICI आणि HDFC बँक कार्ड वापरण्यावर 1000 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. या शानदार बँक ऑफरचा फायदा घेतल्यानंतर या फोनची किंमत 15,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

iQOO Neo 7 5G

या फोनची सुरुवातीची किंमत 26,499 रुपये आहे. तर, त्या स्मार्टफोनची मूळ किंमत 34,499 रुपये इतकी आहे. HDFC आणि ICICI बँक कार्ड वापरण्यासाठी 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

iQOO Neo 7 Pro 5G

हा फोन तुम्ही 39,999 रुपयांपेक्षा रु.32,999 मध्ये खरेदी करू शकता. या फोनवर बँक ऑफर उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला आणखी स्वस्तात फोन खरेदी करू शकता. ICICI आणि HDFC बँक कार्डधारकांना 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन 30,999 रुपयांमध्ये घेऊ शकता.

iQOO 11 5G

हा प्रीमियम फोन तुम्हाला 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. HDFC आणि ICICI बँक कार्ड्सवर 5000 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. म्हणजेच बँकेच्या ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन या फोनची किंमत 44,999 रुपयांपर्यंत कमी करता येईल.

iQOO Z6 Lite 5G

हा 5G स्मार्टफोन 15,999 रुपयांऐवजी 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनी या फोनवर बँक ऑफर देत नाही. .