टेक्नोलाॅजी

स्वस्तात मस्त आणि जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? सॅमसंगने लॉन्च केला आहे स्वस्तातला स्मार्टफोन, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

प्रत्येक जण स्मार्टफोन खरेदी करताना स्वस्तात मिळणारा म्हणजेच बजेट मधील, चांगली रॅम आणि स्टोरेज क्षमता असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असतात. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च होतात आणि बरेच अगोदर पासून आहेत. त्यामुळे जर स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अनेक वेळा गोंधळ उडतो.

परंतु तुमचा देखील असाच स्वस्तातला मस्त आणि चांगले फीचर असलेला स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर यावर्षी मार्च महिन्यामध्ये सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी एफ 15 लॉन्च केला होता व त्याची सुरुवातीची किंमत 12999 रुपये आहे. परंतु सॅमसंग ने आता या स्मार्टफोन करिता एक नवीन व्हेरियंट लॉन्च केले असून हा स्मार्टफोन घेणे खूप बेस्ट ठरेल. त्यामुळे या लेखात सॅमसंगच्या नवीन व्हेरियंटची माहिती बघणार आहोत.

 सॅमसंग गॅलेक्सी एफ 15 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

जर तुम्हाला देखील स्वस्त आणि जबरदस्त वैशिष्ट्य असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सॅमसंगच्या गॅलक्सी एफ 15 च्या नवीन व्हेरियंटमध्ये आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं असून या स्मार्टफोनमध्ये चार अँड्रॉइड ओएस अपग्रेड व त्यासोबत पाच वर्षाचे सिक्युरिटी अपडेट देण्यात आले आहे.

एवढेच नाही तर यामध्ये अँड्रॉइड 14 वर आधारित  One UI 6 सुद्धा असून हा स्मार्टफोन अँश ब्लॅक,जॅझी ग्रीन,ग्रुव्ही व्हायोलेट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन 90 एचझेड रिफ्रेश रेट आणि व्ही शेप नॉच सह साडेसहा इंचएफएचडी प्लस AMOLED डिस्प्लेसह येतो तसेच मीडियाटेक डायमेन्सीटी 6100 प्लस 4/6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह सहा एनएम प्रोसेसरला सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड आहे व ते एक टीबीपर्यंत स्टोरेज एक्सपान्शन करू शकते.

 कसा आहे कॅमेरा?

या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी व पाच मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड अँगल लेन्स व दोन मेगापिक्सल मायक्रो लेन्स सोबत ट्रिपल कॅमेरा मागील सेटअपसह देण्यात आला आहे. तसेच समोर तेरा मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील आहे. यासोबत सॅमसंग गॅलेक्सी एफ 15 मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे व जी त्याच्या यूएसबीसी सी पोर्टद्वारे 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

 किती आहे या स्मार्टफोनची किंमत?

तुम्ही हा स्मार्टफोन 20 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकणार असून त्याची किंमत 15999 रुपये इतकी आहे.

Ajay Patil