टेक्नोलाॅजी

सुनीता विल्यम्स अजूनही अंतराळात, अपोलो-१३ च्या थराराच्या आठवणी ताज्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर या अंतराळ यानातील बिघाडामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. त्यांची टीम १३ जूनला परतणार होती. मात्र नासा आणि बोईंग त्यांच्या परतीच्या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत.

मात्र अशाप्रकारे अंतराळवीर अंतराळात अडकून पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९७० मध्ये मिशन अपोलो-१३ मधील तीन अंतराळवीरांचे पथक अंतराळातील चंद्राजवळील भागात अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना काही दिवस अक्षरशः अन्न पाण्याशिवाय अंतराळात राहावे लागल्याच्या आठवणी सुनीता विल्यम्स यांनी यानिमित्ताने सांगितल्या आहेत.

सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) मध्ये अडकून असले तरी ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ते पुन्हा पृथ्वीवर परतू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नासालाही बोइंग स्टारलाइनरचे निराकरण करून त्यांना परत आणायचे आहे. स्टारलाइनरव्यतिरिक्त नासाकडे इतरही पर्याय आहेत. पण नासाला यापूर्वी यापेक्षाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

हॉलीवूड चित्रपटाप्रमाणेच ‘अपोलो १३’ मिशनमध्ये नासाला अशाच समस्येचा सामना करावा लागला असतानाही नासाने आपले अंतराळवीर पृथ्वीवर आणले होते. मिशन अपोलो १३ मध्ये जिम लव्हेल (हँक्स), फ्रेड हेइस (पॅक्सटन) आणि जॅक स्विगर्ट (बेकन) हे तीन अंतराळवीर अवकाशात अडकले होते.

कमांडर जिम लव्हेल आणि चंद्र मॉड्यूल पायलट फ्रेड हेईस १५ एप्रिल रोजी चंद्र मॉड्यूलवरून उतरल्यानंतर ते येथे ३३ तास थांबणार होते, तर कमांड मॉड्यूल पायलट स्विगर्ट हे कमांड मॉड्यूल ओडिसीमध्ये राहणार होते. हे क्रू पथक २१ एप्रिल रोजी पृथ्वीवर परतणार होते. पण अवकाशयानात झालेल्या स्फोटामुळे ते चार दिवस लवकर पृथ्वीवर परतले.

त्यांचे अंतराळयान कमांड मॉड्यूल जिथे अंतराळवीर होते, चांद्र मॉड्यूल जे चंद्रावर जायचे होते आणि मुख्य इंजिन आणि ऑक्सिजन टाक्यांचा भाग अशा तीन भागात बनवण्यात आले होते. नासाच्या म्हणण्यानुसार, प्रक्षेपणानंतर ५-६ मिनिटांनी त्यांना कंपन जाणवले. मिशनच्या दोन दिवसांनंतर अपोलो १३ क्रूने टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले.

मिशन कंट्रोलने स्विगर्टला ऑक्सिजन टाकीमध्ये नियमित हालचाल करण्याच्या सूचना दिल्या. हे करताच अंतराळयान हलले आणि नऊ मिनिटांनंतर यानामध्ये स्फोट झाला. ऑक्सिजन टाकीत हा स्फोट झाल्याने या स्फोटात एका भागाचे पूर्ण नुकसान झाले. मात्र मोहीम सुरू होण्यापूर्वीच ऑक्सिजन टाकी खराब झाल्याचे नंतर उघड झाले.

घडले काय होते?
सुमारे ५४ वर्षांपूर्वी मिशन अपोलो-१३ तील अवकाशयानात झालेल्या स्फोटामुळे तीन अंतराळवीर पृथ्वीपासून ३.३० लाख किमी दूर चंद्राभोवती तब्बल पाच दिवस, २२ तास ५४ मिनिटे, ४१ सेकंद अंतराळात फिरत राहिले होते. मिशन अपोलो-१३ नासाचे चंद्रावरचे तिसरे मानवयुक्त मिशन होते, ज्याचा उद्देश अंतराळवीरांना चंद्राच्या क्रेटर फ्रा मौरोजवळ उतरवण्याचा होता. यान मोहिमेवर असताना अपोलो १३ वरून रेडिओद्वारे संदेश आला, ‘ह्यूस्टन आम्हाला एक समस्या आहे’. हा संदेश जगभर प्रसिद्ध झाला.

थंडीमुळे झोपही अशक्य !
कमांड मॉड्यूलची इलेक्ट्रिकल सिस्टीम हळूहळू मृतावस्थेत जात असताना नासाने सांगितले की, पृथ्वीपासून खूप दूर असल्याने या अंतराळवीरांकडे वीज, पाणी आणि प्रकाश नव्हता. या काळात अन्न-पाण्याची कमतरता याशिवाय इतरही गैरसोयी होत्या. तापमान ३ अंशावर पोहोचल्याने थंडीमुळे झोपही अशक्य झाली होती.

अशा स्थितीत चंद्रावर उतरणारे चंद्र मॉड्यूल या अंतराळवीरांची जीवन नौका बनले होते. तिघेही परतण्यासाठी त्यात गेले टाकीच्या स्फोटामुळे ते त्याच्या मार्गावरून विचलित झाले. ग्राऊंड स्टेशनने नंतर त्यांचा परतीचा मार्ग दुरुस्त केला. १७ एप्रिल १९७९ रोजी अपोलो-१३ ने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला आणि प्रशांत महासागरात ते सुरक्षितपणे खाली उतरले.

दरम्यान, सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर यांच्या बाबतीतील घटना पूर्णपणे वेगळी असली तरी दोन्ही मोहिमांमधील यानांमध्ये काहीतरी गडबड झाली हे या घटनांमधील साम्य असल्याचे बोलले जात आहे

Ahmednagarlive24 Office