Mobile Care Tips:- सध्याचा काळात जर आपण टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेले आहेतच परंतु या तंत्रज्ञानाचा अनेक विपरीत परिणाम देखील होताना आपल्याला दिसून येत आहे.
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर घोटाळे मोठ्या प्रमाणावर होत आहेतच परंतु इतर अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होण्याची शक्यता वाढतांना आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर आजकाल प्रत्येक जण मोबाईल वापरत असते.
परंतु आता हा मोबाईल वापरत असताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. कारण तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की काही व्यक्ती तुमचा फोन हॅक करून तुमच्यावर लक्ष ठेवू शकतात व गेल्या काही दिवसांपासून अशा मोबाईल हॅक होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.
यामध्ये जर तुमचा फोन हँक झाला तर आपल्याला कळते की नाही हे देखील पाहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण अशा काही महत्त्वाची लक्षणे किंवा संकेत पाहणार आहोत की जे तुमच्या मोबाईल मध्ये जर तुम्हाला दिसून आले तर तुम्ही सहजपणे ओळखू शकतात की तुमचा फोन हँक झाला आहे की नाही.
मोबाईलमध्ये ही लक्षणे दिसल्यास तात्काळ व्हा सावध
1- बॅटरीचे आयुष्य- आपण जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा आपल्याला एक अंदाज असतो की किती वापरानंतर आपल्या फोनची बॅटरी किती संपते? परंतु यापेक्षा जर तुमची फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर तुमचा फोन हॅक झाला असण्याची दाट शक्यता आहे.
कारण यामध्ये जर तुमचा फोन हँक झाला असेल तर बॅकग्राऊंडमध्ये हेरगिरी करणाऱ्या ॲप्समुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते.
2- मोबाईल ओव्हरहीटिंग होणे- हेरगिरी करणारे जे काही एप्लीकेशन असतात ते रियल टाईममध्ये सहसा मोबाईलचे लोकेशन ट्रेकिंग करण्यासाठी जीपीएस सिस्टमचा वापर करत असतात.
अशा परिस्थितीमध्ये मोबाईलच्या हार्डवेअरवर जास्त प्रेशर येतो व तो जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे तुमचा फोन जर अचानकपणे जास्त गरम व्हायला लागला तर तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.
3- डेटाच्या वापरामध्ये वाढ होणे– तुमचा मोबाईल ट्रॅक केला गेला असेल तर डेटाचा वापर अचानकपणे वाढायला लागतो. जे सामान्यपणे दररोज तुम्हाला जितका डेटा लागतो त्यापेक्षा तुम्ही वापर करत नसताना देखील जास्त डेटा संपतो. असे जर घडायला लागले तर तुम्ही सावध होणे गरजेचे आहे.
4- मोबाईलमध्ये काही बिघाड व्हायला लागणे– जर सामान्यपणे फोन हॅक झाला असेल तर स्क्रीन फ्लॅशिंगमध्ये किंवा ऑटोमॅटिक फोनच्या सेटिंगमध्ये बदल होणे किंवा फोन व्यवस्थित काम न करणे इत्यादी गोष्टी देखील दिसायला लागतात.
5- कॉलिंग करताना बॅकग्राऊंड नॉईजची समस्या– बऱ्याचदा काही हेरगिरी करणारे जे काही एप्लीकेशन असतात ते फोन कॉल रेकॉर्ड करत असतात. तेव्हा समजा तुम्ही कुणाला कॉल केला व संभाषण चालू असताना जर वेगळाच कुठलातरी बॅकग्राऊंड नॉईज म्हणजेच इतर आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर तुम्ही पटकन सावध व्हावे. कारण हे फोन हॅक होण्याची लक्षण असू शकते.
6- ब्राउझिंग हिस्टरी
चेक करा– तुमच्या मोबाईलचे ब्राउजिंग हिस्टरी तुम्ही तपासली तर यामध्ये तुम्हाला ट्रेकिंग किंवा हेरगिरी करणारे एप्लीकेशन डाउनलोड करणाऱ्या लिंकची माहिती मिळू शकते..अशाप्रकारे तुम्ही या छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवून तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे ओळखू शकतात.