टेक्नोलाॅजी

Upcoming Mobile Phones : नवीन फोन घेण्याचा विचार आहे का? थांबा..! पुढील महिन्यात येत आहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन !

Published by
Ahmednagarlive24 Office

Upcoming Mobile Phones : पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहेत. जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण पुढील महिन्यात तुम्हाला एकापेक्षा एक फोन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.

नवीन स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये नथिंग फोन (2a), Samsung Galaxy A55 5G, Realme 12 5G आणि Vivo V30 Pro यांचा समावेश आहे. आज आपण या फोनच्या लॉन्च तारखे सोबत फोनमधील फीचर्स जाणून घेणार आहोत.

Nothing Phone (2a)

Nothing Phone (2a) 5 मार्च रोजी भारतीय बाजारात लॉन्चसाठी सज्ज आहे. Nothing Phone (2a) मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. हा स्मार्टफोन MediaTek Dimension 7200 Ultra प्रोसेसरसह येईल.

या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh किंवा 4,800mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस (2a) 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Nothing OS 2.5 वर काम करेल.

Samsung Galaxy A55 5G

Samsung मार्च किंवा एप्रिल महिन्यात Samsung Galaxy A55 5G बाजारात लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन यावर्षीचा फ्लॅगशिप A-सिरीजमधील असण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्टफोन Exynos 1480 SoC प्रोसेसरने सुसज्ज असेल. आगामी स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज असेल. हे Android 14 वर आधारित One UI 6.1 वर काम करेल.

Realme 12 5G

Realme 12 भारतात 6 मार्च 2024 रोजी लॉन्च होईल. Realme 12 मध्ये FHD रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. स्मार्टफोन Dimensity 7050 SoC ने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा सेटअपसाठी, यात मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोर 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी 5,000mAh बॅटरी आहे जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 कस्टम स्किनवर देखील काम करतो.

Vivo V30 Pro

Vivo, 28 फेब्रुवारीला Vivo V30 Pro बाजारात लॉन्च करणार आहे. Vivo V30 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 3D वक्र डिस्प्ले असेल. हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज असेल. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. Vivo V30 Pro मध्ये 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असेल.

Ahmednagarlive24 Office