सध्या भारतामध्ये डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणावर झाले असून जवळजवळ प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. तसेच या इंटरनेटच्या जमान्यामध्ये स्मार्टफोनला अनन्यसाधारण महत्त्व असून इंटरनेटच्या मदतीने जग अगदी जवळ आले आहे.
परंतु आपल्याला माहित आहे की स्मार्टफोनला जरी अनन्यसाधारण महत्त्व असले तरी त्याचा वापर आपण त्याच्यात सिम कार्ड असल्याशिवाय करू शकत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. कारण सिम कार्ड शिवाय स्मार्टफोनला महत्त्वच नाही हे देखील तितके सत्य आहे.
बऱ्याचदा आपण जेव्हा सिम कार्ड घेतो व आपल्याला आधार कार्ड वगैरे द्यायला लागते. अशा पद्धतीने आपल्या नावावर एकापेक्षा अधिक सिम कार्ड असण्याची शक्यता असते. परंतु बऱ्याचदा आपल्याला यामध्ये माहिती पडत नाही की आपल्या नावावर किती सिम कार्ड सध्या ऍक्टिव्ह आहेत.
कारण बऱ्याचदा गुन्हेगार व्यक्ती एखाद्या गुन्ह्यांमध्ये दुसऱ्याच्या नावाच्या सिम कार्डचा वापर करून गुन्हेगारी कारवाई करत असतात. कधी कधी देश विरोधी कारवाईंमध्ये देखील अशाप्रकारे दुसऱ्याच्या नावावर असलेले सिम कार्ड वापरले जाते.
अशा कार्यांमध्ये जर संबंधित व्यक्ती अडकली तर त्या सिम कार्ड वरून आपल्याला देखील खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपल्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत किंवा कोणी सिम कार्डचा वापर करत आहे का?
याची माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत किंवा किती सिम कार्ड चा वापर सध्या होत आहे हे तुम्हाला कळणे खूप गरजेचे आहे.नेमके हे तुम्हाला कसे कळते किंवा कसे कळेल? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
संचार साथी पोर्टल ठरेल महत्वाचे
1- याकरिता तुम्हाला sancharsathi.gov.in किंवा tafcop.sancharsathi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सिटीजन सेंट्रीक सर्व्हिसेस या बटनावर क्लिक करावे लागेल.
2-
त्यानंतर ‘नो युवर मोबाईल कनेक्शन’ यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल कनेक्शन संदर्भातली माहिती प्राप्त होते.3- या ठिकाणी तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल व त्यानंतर तुमच्या नंबर वर एक ओटीपी येईल.
4- हा ओटीपी आल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर मोबाईल क्रमांकाची एक डिटेल्स येते व त्यानुसार तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत हे तुम्हाला कळते.
तुमच्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी वापरत असाल तर काय कराल?
अशाप्रकारे जर माहितीतून तुमच्यासमोर उघड झाले की तुम्ही वापरत नसलेल्या किंवा तुम्ही सध्या वापरत नसलेल्या तुमच्या मोबाईल नंबर सुरू असून इतर कोणीतरी वापरत आहे तर तुम्ही यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करू शकतात व त्यानंतर तो मोबाईल क्रमांक बंद करू शकतात.