आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र ही महत्त्वाची कागदपत्रे असून यापैकी कुठलेही कागदपत्रे आपल्याला शासकीय कामांसाठी अत्यावश्यक असतात. आधार कार्डचा वापर तर आता प्रामुख्याने प्रत्येक शासकीय किंवा बिगर शासकीय कामांसाठी केला जातो.
याच पद्धतीने मतदार ओळखपत्र हे देखील खूप महत्त्वाचे कागदपत्र असून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याकरिता मतदार ओळखपत्राची आवश्यकता भासते. परंतु ही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला काही दृष्टिकोनातून वेळोवेळी अपडेट करणे देखील तितकेच गरजेचे असते.
ज्याप्रमाणे जर आपण एखाद्या वेळी जर राहण्याचा पत्ता किंवा राहण्याचे ठिकाण बदलले तर आधार कार्ड वरील पत्ता देखील आपल्याला अपडेट करणे गरजेचे असते. जर मुलीचे लग्न झाले तर या मुलीचे मतदार ओळखपत्र त्या मुलीच्या लग्न झाल्यानंतर असलेल्या
नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करणे देखील महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सहज असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून नवीन पत्त्यावर मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करू शकतात. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ही पद्धत
1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर तुमचं अकाउंट उघडणे गरजेचे आहे. अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला नॅशनल वोटर सर्विस पोर्टल वेबसाईटवर जाणे गरजेचे असून त्या ठिकाणी लॉगिन करावे लागेल.
2- वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या होम पेजवर ‘शिफ्टिंग ऑफ रेसिडेंस’ हा पर्याय दिसतो व यामध्ये ‘फील फॉर्म 8’ हा पर्याय निवडावा.
3- यामध्ये जर तुम्ही स्वतःसाठी फॉर्म भरत असाल तर सेल्फ या पर्यायावर क्लिक करावे व पुढे EPIC नंबर एंटर करून सबमिट बटणावर क्लिक करावे.
4- नंतर तुम्ही वोटर डिटेल्स नीट तपासून घ्यावी आणि शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट या पर्यायावर क्लिक करावे.
5- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही आवश्यक माहिती भरावी लागेल व यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा तसेच विधानसभा मतदारसंघ, आधार कार्ड क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि नवीन पत्त्याची माहिती भरणे गरजेचे राहील.
6- त्यानंतर त्या ठिकाणी सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे राहिल व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कॅपच्या कोड नमूद करावा लागेल व त्यानंतर रिव्ह्यू अँड सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
7- त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर ॲप्लीकेशन रेफरन्स नंबर येईल.
8- त्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही नॅशनल वोटर सर्विस पोर्टल वरून अपडेट झालेले डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड करू शकतात.