टेक्नोलाॅजी

तुम्हालाही भीती आहे का तुमचा मोबाईल नंबर ट्रॅक होण्याची? तर नका करू काळजी! वापरा ‘हे’ कोड आणि करा माहिती

Published by
Ajay Patil

इंटरनेटच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये अगदी बसून कुठलीही गोष्ट करता येणे शक्य झालेले आहे. तसेच आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे लोक एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेतच परंतु कोण कुठे काय करत आहे? याबद्दलची माहिती देखील झटक्यात आपल्याला मिळवता येते.

म्हणजेच एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करणे किंवा एखादा व्यक्ती कुठे आहे याबद्दलची माहिती मिळवणे ही काय आता मोठी गोष्ट राहिली नसून बाजारामध्ये असे अनेक एप्लीकेशन आहेत ज्याची मदत घेऊन लोक एकमेकांच्या परवानगीने एकमेकांना ट्रॅक करताना आपल्याला दिसून येत आहेत.

परंतु बऱ्याचदा आपल्याला न माहिती आपला मोबाईल नंबर ट्रॅक होत असतो व त्याचा आपल्याला थांगपत्ता देखील लागत नाही. बऱ्याचदा आपल्याला कोणी कॉल करत असेल तर आपला नंबर कधीही व्यस्त जातो किंवा कॉल कनेक्ट होत नाही किंवा कॉल लागतच नाही. अशावेळी तुमचा मोबाईल नंबर ट्रॅक होण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल की तुमचा मोबाईल नंबर ट्रॅक होत आहे किंवा नाही तर याकरिता तुम्हाला या लेखात दिलेले तीन प्रकारचे USSD कोड महत्त्वाचे ठरतील व तुम्हाला मोबाईल नंबर ट्रॅक होत आहे की नाही याबाबत जाणून घेण्यासाठी मदत करतील.

 हे कोड करतील तुम्हाला मदत

1- कोड *#62# – बऱ्याचदा आपल्याला कोणी कॉल करतो व आपला नंबर त्यावेळेस नो सर्विस किंवा नो ॲन्सर असे म्हणतो. अशा पद्धतीने तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही हा दिलेला कोड तुमच्या मोबाईल मध्ये डायल करू शकतात. या कोडची मदत घेऊन तुम्ही तुमचा फोन दुसऱ्या नंबर वर रिडायरेक्ट झाला आहे की नाही हे तुम्हाला लगेच माहिती पडू शकते.

2- कोड *#21# – तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये हा कोड डायल करून तुम्ही तुमचे मेसेज तसेच कॉल व इतर कोणताही डाटा इतर ठिकाणी वळवला जात आहे की नाही हे तुम्हाला माहिती करून घेता येते. जर तुमचे कॉल इतर ठिकाणी वळवले जात असतील तर या कोडच्या मदतीने तुम्हाला नंबरसह संपूर्ण डिटेल्स मिळते. तसेच तुमचा कॉल कोणत्या नंबरवर डायव्हर्ट करण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला माहिती होते.

3- कोड ##002# – हा अँड्रॉइड फोन साठी महत्त्वाचा कोड असून याची मदत घेऊन तुम्ही कोणत्याही फोनवरील सर्व फॉरवर्डिंग बंद करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा कॉल डायव्हर्ट केला जात आहे किंवा डायव्हर्ट होत आहे तर तुम्ही हा कोड डायल करू शकतात.

Ajay Patil