VI 5G : स्वस्तात मस्त, VI लवकरच देणार सर्वात स्वस्त 5G सेवा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

VI 5G : देशात सर्वत्र सध्या 5G ची क्रेझ असून, जिओ आणि एअरटेल यासारख्या कंपन्यांनी आपली 5G सेवा सुरु देखील केली आहे. मात्र आता लवकरच VI देखील आपली सेवा सुरु करणार असल्यामुळे Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, या कंपनीची 5G सेवा ही सर्वात स्वात सेवा असू शकते. जाणून घ्या याबद्दल.

दरम्यान, VI कंपनीने दिल्ली आणि पुण्यातील काही भागात आपली 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया या कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहीत सादर केली नसून. वेबसाइटनुसार, वापरकर्ते 5G रेडी सिमच्या मदतीने हाय स्पीड इंटरनेट वापरू शकतात.

दरम्यान, VI यूजर्ससाठी ही आनंदाची बातमी असून, लवकरच कंपनी भारतात आपली 5G सेवा सुरू करणार आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या वेबसाइटवर सर्व सेवा स्पष्ट करताना, आपल्या 5G सेवेबद्दल माहिती देखील दिली आहे. यामध्ये ब्रँडने सांगितले आहे की Vi 5G सेवा पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अनुभव तुम्हाला Vi 5G रेडी सिमच्या मदतीने घेता येणार आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांनी IMC 2023 मध्ये याबाबत माहिती दिली होती. कुमार मंगलम बिर्ला हे व्होडाफोन आयडियाच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. ते म्हणाले, ‘गेल्या एका वर्षात व्होडाफोन आयडिया टीमने 5G लाँच करण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्यासाठी खूप काम केले आहे. येत्या तिमाहीत, कंपनी 5G रोलआउट आणि 4G विस्तारासाठी लक्षणीय गुंतवणूक देखील करणार करणार आहे.