टेक्नोलाॅजी

Vivo V30 Lite 5G : 50MP सेल्फी कॅमेरा आणि 12GB RAM ! Vivo लॉन्च केला शानदार 5G फोन, किंमत फक्त…

Published by
Ahmednagarlive24 Office

Vivo V30 Lite 5G : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या काळात अनेक कंपन्यांकडून आधुनिक तंत्रज्ञावर आधारित त्यांचे नवनवीन स्मार्टफोन सादर केले जात आहेत.

Vivo स्मार्टफोन कंपनीकडून त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मेक्सिकोमध्ये Vivo V30 Lite 5G हा नवीन स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

विवो स्मार्टफोन कंपनीकडून त्यांचा Vivo V29 Lite 5G हा स्मार्टफोन या वर्षी जूनमध्ये लॉन्च केला होता. आता सादर करण्यात आलेल्या V30 Lite 5G स्मार्टफोनला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo V30 Lite 5G स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज या V30 Lite 5G स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. हँडसेट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP54 रेटिंगसह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

V30 Lite 5G किंमत

विवोने त्यांचे अनेक स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. काही स्मार्टफोनची किंमत जास्त आहे तर काही स्मार्टफोनची अगदी कमी देखील आहे. मेक्सिकोमध्ये लॉन्च करण्यात आलेला V30 Lite 5G स्मार्टफोन फॉरेस्ट ब्लॅक आणि रोज गोल्ड या दोन रंग पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत MXN 8,999 म्हणजेच भारतात अंदाजे 44,100 रुपये असू शकते.

V30 Lite 5G वैशिष्ट्ये

V30 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले, हँडसेट पंच होल कटआउट आणि 1150 निट्स पीक ब्राइटनेस, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर जे Adreno 619 प्रोसेसरसह देण्यात आला आहे.

V30 Lite 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याची मुख्य लेन्स 64MP, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

V30 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4800mAh मजबूत बॅटरी देखील देण्यात आली आहे. स्मार्टफोनला USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office