टेक्नोलाॅजी

Vivo Y28 5G : भारतात लॉन्च झाला Vivo Y28 5G स्मार्टफोन, पहा जबरदस्त कॅमेरा आणि उत्तम फीचर्ससह किंमत…

Published by
Ahmednagarlive24 Office

Vivo Y28 5G : भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक कंपन्या त्यांचे उत्तम स्मार्टफोन सादर करत आहेत.

Vivo स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. त्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Vivo ने त्यांचा आणखी शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Vivo ने त्यांचे अनेक शानदार स्मार्टफोन अगदी कमी बजेटमध्ये सादर केले आहेत. त्यांच्या Y सिरीज स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून आणखी एक Y सिरीज स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. Vivo Y28 5G असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

Vivo Y27 हा स्मार्टफोन जुलै 2023 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y27 ची अपग्रेडेड आवृत्ती Y28 5G सादर करण्यात आली आहे. स्मार्टफोनला 6.5 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रीफ्रेश दर 90Hz असेल. स्मार्टफोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉचसह येईल.

नवीन Vivo स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Vivo Y28 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6020 SoC चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 2 बॅक कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे. प्राथमिक कॅमेरा 50MP आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, कंपनीने या फोनमध्ये 8MP कॅमेरा सेंसर दिला आहे.

Vivo Y28 5G स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. बाजूला देण्यात आलेला फिंगरप्रिंट लॉक आणि अनलॉक करण्यासाठी काम करेल. ग्लिटर एक्वा आणि क्रिस्टल जांभळा अशा दोन रंग पर्यायामध्ये हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

कंपनीने हा फोन तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केला असून या तीन व्हेरियंटच्या किमती

Vivo Y28 5G स्मार्टफोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे.
Vivo Y28 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 रुपये आहे.
Vivo Y28 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office