Vivo Y77t : विवोचा शानदार स्मार्टफोन लाँच! 16 हजारांत मिळणार 12GB पर्यंत RAM असलेला दमदार स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Y77t : विवो ही लोकप्रिय टेक सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. जे लाँच झाल्यानंतर इतर स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देतात. कंपनीच्या प्रत्येक स्मार्टफोनची किंमत वेगवेगळी असते. नुकताच कंपनीने आपला एक फोन लाँच केला आहे.

शानदार फीचरसह कंपनीने Vivo Y77t हा फोन लाँच केला आहे. यात 12GB रॅम दिली आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन LCD डिस्प्ले ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. जो तुम्ही 16 हजार रुपयांपासून खरेदी करू शकता. जाणून घ्या फीचर्स.

जाणून घ्या Vivo Y77t किंमत

Vivo कडून सध्या त्याची प्रास्ताविक किंमत टॅगसह विक्री केली जात आहे. किंमत आणि स्टोरेजचा विचार केला तर कंपनीच्या नवीन Vivo Y77t स्मार्टफोनची 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी RMB 1,399 (अंदाजे रु. 16,000) किंमत इतकी आहे तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत RMB 1,599 (अंदाजे रु. 582, 582) इतकी आहे.

प्रास्ताविक ऑफर संपल्यानंतर, या फोनची किंमत अनुक्रमे RMB 1,499 (अंदाजे रु. 17,150) आणि RMB 1,699 (अंदाजे रु. 19,400) असणार आहे. हा फोन फिनिक्स गोल्ड, ब्लॅक आणि जेड ग्रीन कलर पर्यायांत कंपनीकडून लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन कालपासून चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Vivo Y77t चे स्पेसिफिकेशन

कंपनीच्या नवीन फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.64-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की हा फोन Vivo Y78 चा रिब्रँडेड स्मार्टफोन आहे. हा नवीन फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर स्मार्टफोन आउट ऑफ द बॉक्स Android 13 वर आधारित Origin OS 3 वर काम करतो. तर फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरे दिले आहेत, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर हा फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करेल.