Vivo Smartphones : चीनी स्मार्टफोन निर्माता आपला नवीन फोन Vivo Y200e 5G लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या Vivo Y200 5G मालिकेतील असेल.
Vivo ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, Y200e 5G 22 फेब्रुवारी रोजी देशात लॉन्च होईल. या स्मार्टफोनचे एक प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर देखील लाइव्ह करण्यात आले आहे. या टीझरमध्ये Vivo Y200e 5G दोन रंग पर्यायांमध्ये दिसत आहे.
तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, यासोबत एक गोल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. Vivo Y200 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 1 SoC चिपसेट आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4,800 mAh आहे.
अलीकडेच कंपनीने Y200 5G 8 GB 256 GB च्या नवीन प्रकारात उपलब्ध करून दिला होता. त्याची किंमत 23,999 रुपये आहे. आता येणार फोन कोणत्या किमतीत उपलब्ध होईल हे फोन आल्यानंतरच समजेल.
तसेच Vivo Y200e 5G ला ऑक्टाकोर चिपसेट दिला जाऊ शकतो ज्याचा मॉडेल नंबर SM4450 आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम असू शकते. त्याच्या इतर रॅम आणि स्टोरेज प्रकारांबद्दल अजून कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालू शकतो. यात 1,080×2,400 रिझोल्यूशनसह फुल एचडी स्क्रीन असू शकते.