Vodafone Space Vidio Call:- व्होडाफोनने एक ऐतिहासिक कार्य केले आहे. दूरसंचार सेवा प्रदात्या कंपनीने जगातील पहिला “स्पेस व्हिडिओ कॉल” केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने कोणताही खास सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन वापरला नाही.
याऐवजी साध्या 4G किंवा 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या मोबाइलवरून हा कॉल करण्यात आला. हे तंत्रज्ञान उपग्रह कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी प्रयोग मानले जात आहे.
स्पेस व्हिडिओ कॉल करणारी जगातील पहिली कंपनी
व्होडाफोन ही जगातील पहिली कंपनी बनली आहे जी सॅटेलाइट मोबाईल शिवाय स्पेस व्हिडिओ कॉल करण्याचा विक्रम करू शकली. सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या फ्लॅगशिप डिव्हाइससाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुविधा देत आहेत.
यामुळे सिम किंवा कनेक्टिव्हिटीशिवाय संदेश पाठवणे शक्य होईल आणि हे उपग्रहाच्या सहाय्याने घडते. तथापि या सुविधेसाठी विशेष उपकरणे आवश्यक असतात. जे व्होडाफोनने या प्रयोगात न वापरता साध्या स्मार्टफोनचा वापर केला.
दुर्गम भागाला होईल फायदा
व्होडाफोनच्या अभियंत्यांनी वेल्सच्या पर्वतरांगांमधून या व्हिडिओ कॉलची सुरुवात केली. इथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नव्हते व त्यामुळे कॉल थेट उपग्रहाद्वारे करण्यात आला. याचा सरळ अर्थ असा की आता दुर्गम भागांत जिथे पारंपारिक कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही किंवा प्रदान करणे शक्य नाही अशा ठिकाणीही मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळू शकते.
साध्या फोनवरून उपग्रह कनेक्टिव्हिटी
हे सर्व शक्य झाले AST स्पेसमोबाइलच्या 5 ब्लूबर्ड उपग्रहांच्या मदतीने. या उपग्रहांच्या सहाय्याने व्होडाफोन सामान्य स्मार्टफोनवर 120 एमबीपीएस ट्रान्समिशन सेवा देत आहे. कंपनी लवकरच या तंत्रज्ञानाला वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना तयार करत आहे. यामुळे डोंगराळ आणि दुर्गम भागांतून सुसंगत कनेक्टिव्हिटी मिळवणे अधिक सोपे होईल.
या तंत्रज्ञानामुळे साध्या स्मार्टफोनचा वापर करून उपग्रह कनेक्टिव्हिटीचा लाभ घेणे आता शक्य होईल. जे भविष्यात दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल घडवून आणू शकते. व्होडाफोनच्या या ताज्या उपक्रमामुळे जगभरातील कनेक्टिव्हिटीचा भविष्यकाळ आणखी अधिक आशादायक दिसतो आहे.