टेक्नोलाॅजी

सेकंड हँड आयफोन खरेदी करायचा आहे का ? वाया जाईल पैसा…

Published by
Ajay Patil

बऱ्याचदा आपल्याला वाहनांमध्ये किंवा स्मार्टफोन किंवा इतर गोष्टींमध्ये आवडता ब्रँड खरेदी करायचा असतो. परंतु बऱ्याचदा अशा महागड्या ब्रँडच्या किमती जास्त असतात व नवीन डिवाइस घेताना खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो. परंतु बऱ्याचदा आपल्याकडे आवश्यक असणारा पैसा नसतो व त्यामुळे आपली अशा पद्धतीने आवडीची कार किंवा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.

या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बरेच जण सेकंड हॅन्ड कार किंवा स्मार्टफोन घेण्याला पसंती देतात. परंतु कुठलीही जर सेकंड हॅन्ड वस्तू तुम्हाला विकत घ्यायची असेल तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर पैसा जाऊन नुकसान होऊ शकते व नाहक मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

अशाच प्रकारे आयफोन म्हटले म्हणजे आज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. परंतु आयफोनच्या किमती जास्त असल्याने बरेच जण सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. परंतु सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणेदेखील गरजेचे असते व यासंबंधीचीच माहिती या लेखात आपण बघू.

 सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी करण्या अगोदर घ्या या गोष्टींची काळजी

1- सिरीयल नंबर चेक करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी कराल तेव्हा तो वॉरंटी कालावधीमध्ये आहे का हे तपासणे गरजेचे आहे. याकरिता तुम्हाला अगोदर आयफोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल व त्या ठिकाणी असलेल्या जनरल ऑप्शनमध्ये जाऊन त्यानंतर अबाउट सेक्शन वर क्लिक करावे.

या ठिकाणी तुम्ही आयफोनचा सिरीयल नंबर चेक करू शकता व हा सिरीयल नंबर कॉपी करून जर तुम्ही एप्पल च्या अधिकृत वेबसाईटवर टाकल्यास तुम्हाला त्या आयफोन संबंधी सर्व तपशील मिळतो. या तपशिलामध्ये तुम्ही एक्टिवेशन डेटा तसेच वारंटी पिरेड देखील पाहू शकता.

2- आयफोन व्यवस्थित तपासून घेणे तसेच सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी करण्याअगोदर त्या आयफोनची संपूर्ण  तपासणी करून घेणे अधिक चांगले ठरते. यामध्ये त्यावर कुठल्याही प्रकारचा स्क्रॅच तर नाही ना हे पाहणे खूप गरजेचे आहे

व असा काही प्रकार जर त्या आयफोनवर असेल तर तुम्हाला डील करताना त्या स्मार्टफोनची किंमत कमी करण्यासाठी एक आयतेच कारण मिळू शकते व तुमचा फायदा होऊ शकतो.

3- स्मार्टफोनचा डिस्प्ले खरा आहे का नाही हे तपासणे तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हाही तुम्ही सेकंड आयफोन घ्यायला जाल तेव्हा त्याचा डिस्प्ले आणि बॅटरी तपासणी खूप गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेला आयफोनचा डिस्प्ले हा अनधिकृत सर्विस सेंटरवर बदलला किंवा दुरुस्त केला गेला आहे का नाही हे तपासायचे असेल तर त्यासाठीचा चांगला पर्याय म्हणजे ट्रू टोन फीचर हे आहे व हे फिचर आयफोन 7 सिरीजमध्ये उपलब्ध आहे.

अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले बद्दल माहिती काढायची असेल तर तुम्ही आयफोनच्या सेटिंगवर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या डिस्प्ले व ब्राईटनेस वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही ट्रू टोन सुरू करू शकता. परंतु तुम्ही अशा पद्धतीने जर ट्रू टोन सुरू करू शकत नसाल तर आयफोन दुरुस्त केला गेल्याची दाट शक्यता आहे.

याशिवाय फेस आयडी व्यवस्थित काम करतो की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे. अशाप्रकारे आयफोन  फेस आयडी नोंदणी करण्यामध्ये जर तुम्ही अयशस्वी झाले तर त्या आयफोनच्या डिस्प्ले किंवा फेस आयडी सिस्टीम मध्ये समस्या असू शकते. त्यामुळे या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्याव्यात.

4- आयफोनची बॅटरी तपासणे जर आयफोनची बॅटरी 80% पेक्षा जास्त प्रमाणामध्ये उत्तम स्थितीत असेल तर तो आयफोन विकत घेण्यास कुठल्याही प्रकारची समस्या नाही. परंतु आयफोनची बॅटरीची क्षमता कमी असेल तर मात्र निर्णय घेताना दहा वेळा विचार करणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर आयफोनच्या बॅटरीची स्थिती चेक करायची असेल तर याकरिता तुम्हाला आयफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन  त्या ठिकाणी असलेल्या बॅटरीच्या पर्यायावर क्लिक करावे.

त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या बॅटरी हेल्थ आणि चार्जिंग या पर्यायावर क्लिक करून तुम्ही बॅटरीची स्थिती चेक करू शकता. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही बॅटरीची स्थिती चेक करू शकत नसाल तर तो आयफोन खोटा आहे हे समजून घ्यावे.

5- कॅमेरा तपासून घेणे जर आपण सध्या आधुनिक आयफोन्स पाहिले तर त्यांच्या मागे कमीत कमी दोन कॅमेरे दिलेले असतात. तर प्रो आयफोन्स मध्ये तीन कॅमेरे असतात.

कॅमेऱ्याची स्थिती पाहण्यासाठी कॅमेरा ॲप उघडावे आणि त्याची सर्व फंक्शन काम करत आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. सेकंड हॅन्ड आयफोन घेताना कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड तसेच फोटो काढण्याचा प्रयत्न करून पहावा.

Ajay Patil