Whatsapp New Feature : आता ‘असेही’ चालणार WhatsApp.. ! लवकरच येणार भन्नाट फीचर, वाचा सविस्तर..


व्हॉट्सअॅप सध्या एका मजेशीर फीचरवर काम करत आहे. ज्याचा फायदा पुढे लाखो वापरकर्त्यांना होणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp New Feature : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसांपूर्वी कंपनीने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना मेसेज एडिट करता येणार आहे. सध्या कंपनीकडून अशाच एका नवीन फीचरवर काम सुरु आहे.

जे लवकरच वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. आता Whatsapp फक्त फोन नंबरनेच चालणार नाही तर युजरनेमवरही चालणार आहे. दरम्यान कंपनी सतत नवनवीन फीचर आणत असते. अशातच आता लवकरच वापरकर्त्यांच्या भेटीला एक शानदार फिचर येणार आहे.

सुरु आहे नवीन फीचरवर काम

सध्या WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत असून ज्यात वापरकर्त्यांना युनिक युजरनेम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. दरम्यान WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर विकसित केले जाणार आहे. वापरकर्ते या फीचरचा वापर सेटिंगमध्ये जाऊन करू शकतील.

असे करणार काम

वेबसाइटनुसार, वापरकर्तानाव निवडण्याच्या क्षमतेसह, व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांच्या खात्याची गोपनीयता दुसऱ्या स्तराद्वारे मजबूत करण्यास सक्षम असणार आहे. याचाच अर्थ असा की संपर्क ओळखण्यासाठी फोन नंबरवर अवलंबून न राहता, वापरकर्ते एक अद्वितीय वापरकर्तानाव निवडण्यास सक्षम असणार आहे.

या नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्ते इतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांच्या युजरनेमच्या मदतीने कनेक्ट करू शकणार आहेत. परंतु तुम्हाला यात फोन नंबरची गरज पडणार नाही.

एडिट बटण फीचर

अनेकदा असे होते की व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला की त्यात काही बदल आवश्यक असल्याचे समजते. आता वापरकर्त्यांची ही गरज लक्षात घेता कंपनीकडून एक नवीन फीचर आणण्यात आले आहे. कंपनीने नुकतेच एडिट मेसेज फीचर जोडले असून ज्यात मेसेज पाठवला की तो एडिट करता येतो.

यापूर्वी पाठवण्यात आलेला संदेश एडिट करण्याचा पर्याय येत नव्हता. परंतु, आता हा पर्याय मिळणार आहे. व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज 15 मिनिटांत एडिट करावा लागणार आहे. यानंतर संदेश एडिट करता येणार नाही. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना डिलीट फॉर एव्हरीवन हा पर्याय निवडण्याची गरज पडणार नाही.