टेक्नोलाॅजी

महागडा आयफोन खरेदी करताना जाणून घ्या आयफोन खरा आहे की खोटा! वापरा ‘या’ ट्रिक्स, वाचाल फसवणुकीपासून

Published by
Ajay Patil

Precaution Tips Before Iphone Purchasing:- आयफोन खरेदी करणे हे आजकालच्या तरुणाईचा ट्रेंड असून आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तरुणाईमध्ये दिसून येते. आयफोन म्हटले म्हणजे ते त्यांची उत्कृष्ट गुणवत्ता आणि डिझाईनसाठी खूपच लोकप्रिय आहेत व त्यांची किंमत देखील जास्त असते.

अशावेळी महागडा आयफोन खरेदी करताना आपली फसवणूक तर होणार नाही ना? या दृष्टिकोनातून काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण काही बनावट आयफोन देखील आता बाजारात उपलब्ध असल्याचे दिसून येते व अशा परिस्थितीमध्ये आयफोन घेताना तो खरा आहे की बनावट हे ओळखणे खूप गरजेचे असते.

परंतु बऱ्याच जणांना हे समजत नाही की खरा आणि बनावट आयफोनमध्ये नेमका फरक काय असतो? तसे पाहायला गेले तर दोन्ही प्रकारचे आयफोन दिसायला एक सारखेच दिसतात.

परंतु बारकाईने तपासले तर या दोघांमध्ये खूप मोठा फरक असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आयफोन खरेदी करताना तो खरा आहे की बनावट? हे कसे ओळखावे याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत.

आयफोन खरेदी करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

1- जेव्हा तुम्ही आयफोन खरेदी करायला जातात तेव्हा तुम्ही त्या आयफोनची जी काही पॅकिंग आहे ती व्यवस्थित पाहणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही आयफोन खरेदी कराल तेव्हा आयफोनचा जो काही बॉक्स येतो त्यावर कंपनीचा क्यूआर कोड आहे की नाही हे तपासावे. तसेच त्या आयफोनचा सिरीयल नंबर तपासणे देखील खूप गरजेचे असते.

आयफोन खरेदी करताना अनुक्रमांक आणि आयएमईआय क्रमांक निश्चितपणे तपासावा. या गोष्टी तपासण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन अनुक्रमांक तुम्ही तपासू शकतात व त्यानंतर एप्पलच्या चेक कव्हरेजवर हा अनुक्रमांक टाकू शकतात.या माध्यमातून तुम्ही घेत असलेला आयफोन खरा आहे की बनावट हे तुम्हाला लगेच कळते.

2- तसेच दुसरी पद्धत बघितली तर ती देखील खूप सोपी असून आयफोन खरेदी करताना ही पद्धत तुम्ही वापरू शकतात. यामध्ये घेत असलेल्या आयफोनचा आयएमईआय नंबर तपासावा. हा नंबर काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आयफोनवर *#06# डायल करावा आणि बॉक्सवर लिहिलेला आयएमईआय नंबरशी जुळवून पहावा.

दोन्ही नंबर जर एकच असतील तर तो फोन ओरिजनल म्हणजेच खरा आयफोन आहे हे समजावे. याशिवाय तुम्ही iOS आवृत्ती आणि सॉफ्टवेअर आवृत्ती द्वारे देखील आयफोन खरा आहे की बनावट हे ओळखू शकतात.

तसाच हा फोन सिरीज मध्ये उपलब्ध असेल तर तो अस्सल आहे असे समजावे. महत्वाचे म्हणजे आयफोन साठी ॲपल स्टोअरला सपोर्ट करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही घेत असलेला आयफोन एप्पल स्टोरला समर्थित नसेल म्हणजेच सपोर्ट करत नसेल तर तो फोन बनावट असू शकतो.

Ajay Patil