टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy : मोबाईल मार्केटमध्ये करणार धुराळा…! सॅमसंग लॉन्च करत आहे सर्वात स्वस्त आणि दमदार फोन…

Published by
Renuka Pawar

Samsung Galaxy : सॅमसंग कंपनी एका मागून एक स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहे, अशातच कंपनी आता आणखी एक मोबाईल फोनवर काम करत आहे. कंपनी येत्या काही दिवसांत Galaxy F सिरीज मधील पुढील आवृत्ती सादर करण्याच्या तयारीत आहे, सॅमसंगचा आगामी फोन मागील फोनसारखाच खास असणार आहे. त्यातील काही फिचर्स समान असतील तर काही फीचर्समध्ये बदल पहायला मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग कपंनी Samsung Galaxy F55 हा फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन भारत तसेच बांगलादेशच्या बाजारपेठेत आणला जाईल. जर हे डिव्हाइस लॉन्च झाले तर ते Samsung Galaxy F54 चा उत्तराधिकारी म्हणून येऊ शकते . सॅमसंगचा Galaxy F55 जूनमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा फोन नवीन प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F54 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 हजार mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देतो.

Samsung Galaxy F54 मध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे फुल एचडी रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे. डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

Galaxy F54 मध्ये 108-megapixel ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. नवीन फोनमध्येही कॅमेरा आणि डिस्प्ले समान असू शकतात. तथापि, इतर प्रकरणांमध्ये सुधारणा दिसू शकते.

Samsung Galaxy F55 फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन मिड बजेटमध्ये सादर करण्यात येईल. या फोनची किंमती जरी कमी असली तरी देखील कपंनी यात भरपूर फीचर्स देऊ शकते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar