टेक्नोलाॅजी

विजेसंबंधी काही तक्रार असेल तर महावितरणच्या कार्यालयात का जायचे? महावितरणच्या अँप व ऊर्जा चॅट बॉटचा वापर करा आणि घरबसल्या तक्रार नोंदवा

Published by
Ajay Patil

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो व त्यासोबतच राज्यात अवकाळी पावसाचा जोर देखील बऱ्याच ठिकाणी दिसून येत असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणे किंवा विजेचे पोल पडणे इत्यादी समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहेत.

तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये एसी तसेच फॅन व कुलर सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने विज बिल वाढल्याच्या देखील अनेक तक्रारी या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा समस्या महावितरणाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला महावितरणच्या ऑफिसमध्ये जावे लागते किंवा फोन तरी करावा लागतो.

परंतु आता या संबंधीच्या तक्रारी करण्यासाठी तुम्हाला महावितरणला फोन करण्याची किंवा त्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज नसून आता ग्राहकांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर महावितरणच्या एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. एवढेच नाही तर महावितरणच्या महाडिस्क या वेबसाईटवर ऊर्जा चॅट बॉट सुरू करण्यात आलेले असून या माध्यमातून ग्राहकांना अनेक समस्या आरामात सोडवणे शक्य होणार आहे.

 महावितरणने सुरू केले ऊर्जा चॅट बॉट

महावितरणाच्या महाडिस्क या संकेतस्थळावर ऊर्जा चॅट बॉट सुरू करण्यात आले असून यामुळे आता वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन, वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या तसेच वारंवार विजेचे जा-ये किंवा महिन्याला आलेले जास्तीचे वीज बिल इत्यादी बाबतच्या तक्रारी आता करता येणार आहे.

राज्य विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने नवीन चालू आर्थिक वर्षापासून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांचे वीज बिल वाढवण्यात आले असून एप्रिल महिन्याचे बिल हे मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. परंतु यामध्ये सरासरी 50 ते 200 रुपये पर्यंत वीज बिल वाढीव येत असल्याने ग्राहकांना संभ्रम निर्माण होत आहे आणि ग्राहकांना जास्तीचे वाढीव बिल अचानक आल्यामुळे महावितरणच्या चुकीने हे घडले असं वाटत आहे.

त्यामुळे महावितरण कडे यासाठीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. म्हणून महावितरणने आता महावितरण ॲप्लिकेशन देखील सुरू केले आहे. एप्लीकेशनच्या माध्यमातून वीज ग्राहकांना वाढीव बिलाच्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. तसेच ऊर्जा चॅटबॉटच्या मदतीने नवीन विज जोडणी,

विज बिल भरणा, तक्रार निवारण इत्यादींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे व विविध शुल्कांचा ऑनलाईन भरणा, स्वतः मीटरचे वाचन व सबमिशन, गो ग्रीन नोंदणी तसेच वीज वापर व बिलाचा सविस्तर हिशोब इत्यादी बाबत वीज ग्राहकांना याच्यामुळे मदत होणार आहे.

 महावितरणचे ॲप आणि वेबसाईट करेल

मदत

महावितरणच्या माध्यमातून एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅट बॉट महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून ते इंग्रजी व मराठी भाषेत असल्याने महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत. त्यासोबतच महावितरण ॲप देखील सुरू करण्यात आलेले असून ग्राहकांना घरबसल्या अनेक सुविधांचा लाभ आता मिळणार आहे.

Ajay Patil