ZTE Smartphone : ZTE Axon 40 Pro जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चिनी मार्केटमध्ये आधीच लॉन्च झाला आहे. फोनच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 108MP कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 870 5G प्रोसेसर आहे. तसेच, यात गेमिंगसाठी कूलिंग थर्मल मॅनेजमेंट सिस्टम फीचरही आहे.
ZTE 40 Pro चे वैशीष्ट्य
हा फोन 6.67 इंच फुल एचडी AMOLED वक्र डिस्प्लेसह येतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच, त्याच्या डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080*2400 आहे. यात 5,000 mAh बॅटरी आहे, ज्यासह 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.
हा ZTE फोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरवर काम करतो. यात 256GB पर्यंत UFS3.1 स्टोरेज आणि 12GB पर्यंत LPDDR5 रॅम सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो, 8GB RAM 128GB आणि 12GB RAM 256GB स्टोरेज.
या फोनच्या कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 108 एमपी प्राइमरी सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर मिळेल. फोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.
ZTE Axon 40 Pro मध्ये 5G कनेक्टिव्हिटी, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत. तसेच, यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्टिरिओ स्पीकर, फिंगर प्रिंट सेन्सर यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. हा फोन Android 12 OS वर काम करतो.
ZTE Axon 40 Pro ची किंमत
ZTE Axon 40 Pro च्या बेस मॉडेलची किंमत सुमारे $499 म्हणजेच 39,655 रुपये आहे. तर इतर व्हेरिएंट 12GB 256GB ची किंमत $599 म्हणजेच 47,605 रुपये आहे. ZTE च्या अधिकृत वेबसाइटवरून यूजर्स हा फोन खरेदी करू शकतात. हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन भारतात लॉन्च होईल की नाही याबाबत सध्यातरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ZTE ने Axon 40 Ultra फोन मे मध्ये लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेजसह येतो.