अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- दोन वाहनांतून 24 गोवंश जनावरे निर्दयपणे दाटीवाटीने भरुन वाहतूक करताना मिळून आल्याने दोघाांवर नेवासा पोलिसांनी खडकाफाटा टोलनाक्यानजीक गुन्हा दाखल केला आहे.

सय्यद जेऊरअली अश्पतअली रा.वाळुंज ता. गंगापूर जि. औरंगाबाद व मोहम्मद रफिक मोहम्मद हनीफ (रा. औरंगाबाद) यांच्या गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एका टेम्पोमधून 16 गोवंश जनावरे दाटीवाटीने भरुन

तर दुसऱ्या टेम्पोमधून 8 गोवंश जनावरे दाटीवाटीने भरुन हे दोघे टेम्पो चालक अहमदनगरहून औरंगाबादकडे ही जनावरे घेवून जात होती. दरम्यान खडका फाटा टोलनाक्याजवळ वाहने अडवून जनावरांची सुटका करण्यात आली.

टेम्पोमध्ये एकूण 18 संकरीत गायी, दोन खिलारी गायी, दोन वासरे व दोन बैल अशी 3 लाख 3 हजार 500 रुपये किंमतीची गोवंश जनावरे होती.

साडेअकरा लाख रुपये किंमतीचा एक टेम्पो तसेच पाच लाख रुपये किंमतीचा दुसरा टेम्पो या दोन वाहनातून ही 24 जनावरे जप्त करण्यात आली.

जनावरे व टेम्पो मिळून 19 लाख 53 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.