अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक अक्षरश: एकमेकांमध्ये घुसले होते.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,

बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लातूरहून औरंगाबादला निघालेल्या एसटीचा अपघात झाला.

अंबाजोगाईमध्ये वळणावर एसटी आणि ट्रकने एकमेकांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण आहे की, बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवावी लागली आहे.

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आठ जण गंभीर जखमी असून त्यांना अंबाजोगाईमधील स्वामी रामातीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटननेंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.