सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आज झालेल्या नाट्यमय घडामोडीत इतर मागासवर्गीय गटातील उमेदवार मुरकुटे श्रीकृष्ण गंगाधर यांनी निवडणुकीतून माघार घेत आपला पाठींबा विद्यापीठ विकास मंचला जाहीर केला.

लोणीत आज झालेल्या बैठकीत मुरकुटे श्रीकृष्ण यांनी आपल्या सहकारी मित्रासह डॉ राजेंद्र विखे पाटील यांची भेट घेत आपला बिनशर्त पाठींबा विदयापीठ विकास मंचला जाहीर केला.

यामुळे श्री मुरकुटे यांनी केलेली पदवीधर मतदार नोंदणीचा फायदा उद्या दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी होणाऱ्या निवडूकीत विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना होणार आहे.

श्रीकृष्ण मुरकुटे या पाठींब्यामुळे विद्यापीठ विकास मंचचे इ. मा. व. प्रवर्गाचे उमेदवार गोर्डे सचिन शिवाजी यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

मुरकुटे यांच्या निर्णय नंतर त्यांनी आपल्या पाठींब्याचे पत्रक त् डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्याकडे सु्फूर्द केले. यावेळी श्री मुरकुटे यांचा सत्कार डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी केला. यावेळी मोठया कार्यकर्ते उपस्थित होते.