file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- तीन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील एका कंपनीस आग लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.

एवढी मोठी आग लागलेली असतानाही या घटनेबाबत गोपनीयता बाळगली असल्याचे निदर्शनास आले आहे. आगीची घटना घडली असतानाही कोणतीही हालचाल झाली नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, या कंपनीत अवैध मद्यनिर्मितीसाठी केमिकल बनवले जात असल्याची व त्याबाबत सुगावा लागल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी आग लावली गेली असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

कारण यापूर्वीही या परिसरातून अशाप्रकारचा उद्योग उघडकीस आला होता. अग्निशमन बंबाला बोलावून आग विझविण्यात यश आले. मद्यार्क तस्करीचा हा प्रकार नसावा ना?

अशी शंका परिसरातील नागरिक चर्चा करताना व्यक्त करताना दिसत आहेत. पोलीस यंत्रणेला कुणकुण लागल्याने ही आग लावली गेली असावी अशीही चर्चा होत आहे.