अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी होणार आहे.

आज त्यांचा साखरपुडा गडाख आणि घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात या लग्नाची मोठी चर्चा आहे. अखेर आज उदयन आणि डॉ. निवेदिता यांचा साखरपुडा पार पडला.

कोण आहेत डॉ. निवेदिता? उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून. ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

नातेसंबंधाचा राजकारणात फायदा होणार? दरम्यान आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत.

तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. महाविकास आघाडीतील नेत्यांचे आपसातील नातेसंबंधांची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

हे नातेसंबंध पुढील राजकारणाच्या दृष्टीने देखील दोन्ही कुटुंबाला फायद्याचे ठरणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.