अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- ऋतू कोणताही असो. सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं. थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते.

कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, ज्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते.

उन्हाच्या सेवनाने शरीरात श्‍वेत रक्त कणांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते. जे आजार निर्माण करणाऱ्या कारकांशी लढण्याचे काम करते. आपल्याला तंदुरुस्त ठेवणे. आजार दूर राहतात. सूर्याची किरणं रोगनिवारक आहेत, ज्याच्या सेवनाने आपलं शरीर अनेक आजारांपासून दूर राहते.

» कर्करोगापासून बचाव : – सूर्यकिरणांमध्ये अँटिकॅन्सखर घटक असतात, जे कर्करोगाचा धोका टाळतात. ज्यांना कर्करोग आहे त्यांना उन्हामुळे आजारात आराम वाटतो. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, जेथे ऊन कमी वेळासाठी असते किंवा ज्या व्यक्ती उन्हात कमी वेळ घालवतात, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते.

» रक्तसंचारात सुधारणा : – रक्तसंचार योग्य प्रकारे व्हावा, यासाठी शरीराला उष्णता किंवा ऊर्जेची गरज असते. उष्णता मिळण्याने शरीर आकुंचन पावत नाही.

» पचन ठीक राहते : – पचनाचे काम जठराग्नी द्वारे होते. पुरेशा प्रमाणात सूर्याची उष्णता घेण्याने जठराप्री अधिक सक्रिय होतो आणि अन्नही व्यवस्थित पचतं.

» शारीरिक शक्ती मिळते : – जेव्हा अन्न व्यवस्थित पचेल आणि शरीराला लागेल तेव्हा धातूंनी पुष्ट होण्याने शरीरात ओजाची निर्मिती होईल आणि बल टिकून राहील.

» नैराश्य दूर होते : – योग्य प्रमाणात ऊन न मिळण्याने शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण कमी होतं. यामुळे नैराश्याची शक्‍यता वाढते. पूर्ण ऊन मिळण्याने सेरोटोनिन पूर्ण प्रमाणात तयार होतं आणि मानसिक स्थितीही ठिक राहते. उन्हात बसल्याने मूड ही ठिक होतो. कारण उन्हामुळे सेरोटोनि आणि एुंडोर्फिन योग्य प्रमाणात तयार होतं.

हा हार्मोन हॅपीनेस निर्माण करतोच, त्याचबरोबर मानसशास्त्रीय आणि भावनात्मक आरोग्य ही चांगलं ठेवतो. हा शरीराच्या घड्याळाला संतुलित ठेवण्यास ही सहायक ठरतो. कारण उन्हाचा परिणाम आपल्या पीनियल ग्लैँडबर होतो. ही ग्लँड शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती करते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता ठरते, झोपेत सुधारणा होते.

» मानसिक समस्या : – उन्हात बसण्याने एसएडी म्हणजेच सीजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर आणि झोपेशी संबंधित अन्य समस्या दूर होतात.

» किती वेळ उन्हात बसावं ?

० सूर्य उष्णतेचा स्रोत आहे. आयुर्वेदानुसार उन्हाच्या संपर्कात जास्त वेळ राहण्याने शरीरात पित्ताची वृद्धी होते. ज्यास अतियोग असे म्हणतात.

० उन्हाचा योग्य फायदा घेण्यासाठी आठवड्यातील कमीत कमी तीन-चार दिवस सकाळी किंवा संध्याकाळी वीस ते तीस मिनिटांसाठी उन्हात बसावं.

० सकाळची वेळ ही स्वाभाविकपणे कफ तयार करणारी असते. म्हणून सकाळी दहानंतर उन्हात बसणे उत्तम.

० वृद्धावस्थेत वातदोषाचे आधिक्य आढळते. तसेच संध्याकाळच्या वेळेस वायुदोष बळावतो. म्हणून वृद्धांनी दुपारच्या वेळेत उन्हाचा लाभ घ्यावा.

० सामान्य रंगाच्या व्यक्तींनी तीस मिनिटं, गोऱ्या रंगाच्या व्यक्तींनी पंधरा हे बीस मिनिटं आणि सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या व्यक्तींनी तीस मिनिटांहन जास्त काळ उन्हात बसू नये.

» फायदे अनेक : –

० ड जीवनसत्त्व शरीरात हाडांना मजबूत करतं. हाडे मजबूत करते. या जीवनसत्त्वाचा उत्तम नैसर्गिक स्रोत सूर्यप्रकाश आहे. शरीरात योग्य प्रमाणात ड जीवनसत्त्व असते, यामुळे शरीराला कॅल्शियमही लागते आणि फायदा होतो.

० सूर्याच्या उष्णतेमुळे थंडीने गारठलेल्या शरीराला उष्णता मिळते, ज्यामुळे थंडीमुळे निर्माण झालेल्या अंतर्गत समस्या दूर होतात. शरीराचे आखडले पण दूर होतं.

० हिवाळ्यामुळे आखडलेली हाडं आणि पेशी मोकळ्या होतात.

० शिरा आणि सांध्यांवरही याचा परिणाम होतो. म्हणजे सर्व शारीरिक हालचाली नैसर्गिक अवस्थेत राहून आरोग्य प्रदान करतात