अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील देडगाव येथील अपहरण केलेल्या सत्यम संभाजी थोरात या पाच वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह छन्नविछन्न अवस्थेत शेतात आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आहे.

याप्रकरणी नेवासे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे…

प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे वय (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील देडगाव येथे बुधवारी (ता. २०) यात्रा होती. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सत्यमचे अपहरण झाले होते.

तशी फिर्याद त्याची आजी प्रमिला शिवाजी थोरात यांनी नेवासे पोलिसांत दिली होती. दरम्यान या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह देडगाव-माका शिवारातील शेतात तब्बल सहा दिवसांनी सोमवारी (ता. २५) सायंकाळी सापडला.

त्याचे दोन्ही हात, उजवा पाय घोट्यापासून तोडलेला व गळा चिरलेला होता. याबाबत देडगावच्या सरपंच यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत नेवासे फाटा येथे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याप्रकरणी प्रमिला थोरात यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी वरील चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.