अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे पानमळा परिसरात शिर्डी-सिन्नर महामार्गावर इनोव्हा गाडी जळालेल्या अवस्थेत काही नागरिकांना आढळून आली आहे.

दरम्यान विशेष बाब म्हणजे गाडी जळालेल्या अवस्थेत असताना गाडीचा आजूबाजूला कोणीच आढळून आले नाही. गाडी कुठली व गाडीचा मालक कोण याबाबत अजूनही काही समजलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पांढऱ्या रंगाची गाडी असून याबाबत कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गाडीच्या संदर्भात गाडी मालक किंवा अन्य कोणी देखील आले नसल्याचे समजते आहे.

परिसरात जळालेली गाडी असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होत असून तपास लागल्यानंतरच सत्य समोर येईल.