अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी एकाला न्यायालयाने दोषी धरून पाच लाख 60 हजार रुपये दंड करून एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.(company check bounced)

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कनगर येथील शरद भाऊसाहेब घाडगे आणि भाऊसाहेब गोविंद घाडगे यांनी सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमर्शियल फायनान्स लि. या कंपनीकडून चार लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते.

कंपनीने कर्ज रक्कमेची मागणी केली असता शरद घाडगे याने 5 लाख 58 हजार 779 रुपयांचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश वटला नाही.

त्यामुळे कंपनीने शरद घाडगे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमध्ये कंपनीतर्फे सुशिल चहाळ यांचा जबाब व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्यात आली.

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी श्रीमती वाय. एम. तिवारी यांनी एकास दोषी धरून पाच लाख 60 हजार रुपये दंड करून एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.