अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  सध्या थंडी गारठा चांगलाच वाढला असून जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्रावर तापमापकाचा पारा ९ अंशावर गेला आहे, अशी माहिती प्रभारी हवामान निरीक्षक चेतन पऱ्हे यांनी दिली.

दिवसरात्र वाहणाऱ्या गार वाऱ्यांनी हुडहुडी भरली आहे. स्वेटर, कानटोेपीशिवाय फिरणे अशक्य झाले आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे बाजारपेठाही ओस पडलेल्या दिसून येत आहे. रात्री आठनंतर वर्दळ असलेला गोदाकाठ गेल्या दोन दिवसांपासून निर्मनुष्य दिसून येत आहे.

या थंडीचा रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच फळबागांना लाभ होत आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.

या वातावरणाचा रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच फळबागांनाही लाभ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.