file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- शहरात स्मार्ट LED प्रकल्पाच्या माध्यमातुन स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरू असून नवीन एल ई डी लाईट मुळे शहरात अंधार होताना दिसत आहे.

नवीन प्रकलपाच्या माध्यमातुन महानगर पालिकेच्या महिन्याला फक्त दोन ते तीन लाख रूपये वाचत असताना सत्ताधारी तसेच लोकप्रतिनिधी ठेकेदाराच्या दावणीला बांधलेल्या दिसत आहे. या आधी शहरातली खाबांवर १५० व्होल्टेजचा सोडियम, एलईडी दिव्यांच्या माध्यमातून लाईटचा प्रकाश शहरातली प्रत्येक विद्युत पोल द्वारे दिला जात होता.

परंतु शहराच्या हिताचा प्रकल्प सांगून प्रत्येक विद्युत खांबावर ३६ व्होल्टचे एल ई डी लाईट बसविण्याचे काम सुरू असून त्याद्वारे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरातील लोकप्रतिनिधी, सत्ताधारी यांच्या आर्थिक हिताचा असुन जनतेला भविष्यात अंधारात ठेवणारा हा प्रकल्प आहे.

त्यामुळे शहरात या मागे जश्या पध्दतीचा प्रकाश होता तसाच प्रकाश या पुढे पडला पाहिजे हा मनसेचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेला अंधारात ठेवणार नाही दिवाळी नंतर आयुक्तांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर निवेदन देऊन शहरात एलईडी लाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उजेड पडेल

अश्या प्रकारच्या एल आय डी लाईट फिटिंग बसविण्याची मागणी मनसे करणार आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा असुन जनतेला दिशाभूल करण्याचे काम शहरातील लोकप्रतिनिधी, आयुक्त तसेच सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे हया प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात अंधार निर्माण होऊ नये हि मनसेची अपेक्षा आहे.

शहर जर अंधारात अशाच प्रकारे राहिले तर दिवाली नंतर आयुक्तांचा दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.