अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी महानेट या कंपनीद्वारे ऑनलाईन प्रणाली बसवण्याचे काम सुरू होते.रविवारी रात्री कंट्रोल रूमला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार सुमारे 87 लाख रुपयांचे यांत्रिकी उपकरणांचे अंदाजे नुकसान झाल्याचा पंचनामा तहसील कार्यालयाने केला आहे.

राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन व्हावा यासाठी महानेट (आयटी) या शासन मान्य कंपनीला ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्याचे कामकाज दिले आहे.

दरम्यान राहाता तालुक्यातील जवळपास 30 ग्रामपंचायतींसाठी ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले होते व राहिलेल्या 20 ग्रामपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याने 1 ते 2 महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण होऊन राहाता तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन सुरू होणार होते.

राहाता येथील तहसील कार्यालयात कंट्रोल रूम मध्ये सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे साहित्य बसविण्यात आले होते. रविवारी रात्री राहाता शहरात मुसळधार पाऊस झाल्याने ही शॉर्टसर्किट ची घटना घडली असावी असा अनेकांचा अंदाज आहे.

तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने नेमकी आग कशामुळे लागली याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून या आगीमध्ये तब्ब्ल 87 लाख रुपये किमतीच्या वस्तूचे नुकसान झाल्याचा पंचनामा राहाता येथील तलाठी शिरोळे यांनी केला आहे.