कोल्हे कारखान्याच्या संचालकांनी अचानक भेट देत उस तोडणी प्लॉटची केली पहाणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी केली.

तसेच यावेळी कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वाहतूक होत आहे की नाही याबाबतची खातरजमा केली आहे. दरम्यान सुतार यांनी ऊस तोडणी मजूरांशी प्रत्यक्ष संपर्क साधला.

त्याच बरोबर ऊसाची जमिनीलगत तोडणी वाढे छाटणी होते की नाही व करोना संदर्भात लसीकरणाची स्थिती जाणून घेतली.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, विद्यमान अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक यांनी ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी चालू आहे की नाही,

तसेच साखर आयुक्तांच्या आदेशानुसार व परीपत्रकानुसार सर्व सूचनांचे पालन होते की नाही याची खात्री केली. यावेळी ऊस तोडणी मजुरांचे आरोग्य, त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांची खात्री करण्यात आली.

दरम्यान कारखाना परिसरात सर्व ध्येय धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्या बाबतची प्रत्यक्ष खात्री करून समाधान व्यक्त केले.

तसेच यावेळी त्यांनी कामगाराना करोना काळात सोशल-डिस्टसींग, मास्कचा वापर, वारवार हाथ धूणे व सॅनीटायझर वापरा संबंधी सूचना व मार्गदर्शन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!