अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या महामारीमुळे अनेक नियोजित गोष्टी काहीकाळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची परिस्थिती निवळत असल्याने त्याचा प्रलंबित गोष्टी आता सुरु करण्यात येऊ लागल्या आहेत.

यातच प्रामुख्याने राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समित्यांचा निवडणुकीसाठी कोरोना अढथळा ठरत होता मात्र आता या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबतचे आदेश राज्याच्या सहकार आणि पणन खात्याने काढले असून 23 ऑक्टोबरनंतर बाजार समित्याच्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. नगर जिल्ह्यात 14 बाजार समित्यापैकी 12 बाजार समित्यांची मुदत संपलेली असून त्या निवडणुकीस पात्र आहेत. दिवाळी झाल्यानंतर या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

राज्याच्या सरकारच्या सहकार खात्याने 24 एप्रिल 2021 ला राज्यात कोविडचा प्रभाव वाढल्याने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणूका या 23 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकल्या होत्या. मात्र, आता कोविडचा प्रभाव कमी झाला असल्याने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. दरम्यान नगर आणि पारनेर बाजार समितीची मुदत देखील नोव्हेेंबर आणि डिसेंबरमध्ये संपणार आहे.

यामुळे त्यानंतर पुढील तीन महिन्यांत या दोन्ही बाजार समितीची निवडणूक होणार आहेत. या दोन्ही बाजार समित्या महत्वाच्या असून यामुळे जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत या दोन निवडणुका चांगल्याच गाजणार आहेत.

सध्या पारनेरची बाजार समिती ही राष्ट्रवादीच्या ताब्या असून नगरची बाजार समिती ही भाजपच्या ताब्यात आहे.