अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी आपले काम आटोपून पुन्हा आपल्या गावी जात असताना पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्यांची शेतकर्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याला लुटल्याची घटना श्रीरामपुरात घडली आहे.(Robbed the farmer)

याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील दौंडेवाडी येथील शेतकरी नानासाहेब लक्ष्मण नेहे यांनी फिर्याद दिली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेतकरी नेहे हे त्यांच्या मोटारसायकलवरुन ते त्यांच्या दौडेवाडी या गावी चालले होते. श्रीरामपूर एमआयडीसी जवळील यशवंत बाबा चौकी याठिकाणी पाठिमागून पल्सर या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या मोटारसायकलला आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले.

त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत नेहे यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.