Ahmednagar News : फसवणूकीच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून पसार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गणेश विनायक बुर्‍हाडे (वय 55 रा. क्रांती चौक, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

येथील चंद्रमा नागरी पतसंस्थेमध्ये ठेवलेली मुदत ठेव व सेव्हिंग खात्यातील पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून तोफखाना पोलिसांच्या हवाली केले आहे.

अनिल दत्तात्रय सानप (रा. आनंदनगर, गुलमोहर रोड) यांनी सन 2017 मध्ये याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात उमेश चंद्रकात रेखे, अंजली अजित महाजन, श्रीकृष्ण नामदेवराव नवले, सुजाता असाराम साळवे, प्रदीप पांडुरंग पंडित, लहू सयाजी घगाळे यांना यापूर्वी अटक झालेली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुर्‍हाडे याला आज (रविवार) दुपारी अटक करून तोफखाना पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी वर्ग केले आहे