अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  एका मुलीला स्वतःसाठी चांगली उंची असलेला बॉयफ्रेंड हवा होता (Girlfriend-Boyfriend). मात्र, तिची स्वतःची उंची खूपच कमी (Short Height Girl) होती.

या मुलीने सांगितले की, तिला 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचा बॉयफ्रेंड हवा आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मुलांकडे ती पाहतसुद्धा नसे. पण नुकतेच तिला एका मुलाकडून असे उत्तर मिळाले, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वास्तविक, Reddit या अमेरिकन वेबसाईटवर वर एका व्यक्तीने सांगितले आहे की, त्याने त्या मुलीला कश्यापद्धतीने उत्तर दिल आहे ते. जी तिच्यापेक्षा खूप उंच मुलाला डेट(date) करू इच्छित होती,परंतु तिची स्वतःची उंची खूपच लहान (Short Height Girl) होती.

मुलाने मुलीला दिले सणसणीत उत्तर ! या मुलाने सांगितले की, तो एका डेटिंग अॅपवर एका मुलीला भेटला होता. चॅटिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच मुलीने त्याला विचारले की, तो किती उंच आहे.

मुलाची उंची 6 फूट 3 इंच असल्याचे समजताच तिने आनंद व्यक्त केला आणि हीच योग्य उंची असल्याचे सांगितले. मुलीचे म्हणणे ऐकून त्या मुलाच्या लक्षात आले की ती फक्त ‘चांगल्या दिसण्याला’ प्राधान्य देते आहे. अशा स्थितीत मुलालाही मुलीची उंची जाणून घ्यायची होती.

मात्र जेव्हा त्याने मुलीला तिच्या उंचीबद्दल विचारले तेव्हा तिची उंची केवळ 5 फूट 1 इंच असल्याचे आढळून आले. यावर मुलाने उत्तर दिले की, आपल्या दोघांच्या लांबीमध्ये खूप फरक आहे आणि इतक्या अंतराने आमची जोडी परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या उत्तराने मुलगी स्तब्ध झाली आणि तिने त्याला विचारले की, तो तिला लांबीमुळे नाकारत आहे का ? यावर त्या मुलाने मुलीला तिची चूक लक्षात आणून दिली आणि म्हणाला- ‘तिनेही तेच केले आहे !

तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर स्पष्टपणे लिहिले आहे कि, फक्त 6 फूट उंचीच्या मुलाची तुम्हाला गरज आहे. त्या मुलाने या संभाषणाचा स्क्रीनशॉट (screenshot)शेअर केला आहे,

ज्यावर Reddit चे युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. बरेच युजर्स मुलाची बाजू घेत आहेत आणि मुलीला ‘योग्य उत्तर’ दिल्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत.