सरत्या वर्षाला निरोप देताना सरकारने जाहीर केली नियमावली …….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याचे अनेकांनी नियोजन केले असेल. मात्र ओमायक्रॉनचा (Omaicron) वाढलेला धोका लक्ष्यात घेऊन सरकारने जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत  नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालणारा निर्णय घेतला आहे.

जल्लोश्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते हे लक्ष्यात घेऊन राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु (night curfew) लावला आहे. सरते वर्ष कसे साजरे करावे याबाबत सरकारने एक नियमावलीच जाहीर केली आहे.

त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन गृह खात्याकडून ( Home Department) करण्यात आले आहेत.

1. नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे

2. राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून याचे पालन करावे.

3. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

4. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजिक करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहेय

5. कोणत्याबी प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आण सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्जंतूरीकरणाची व्यवस्था करावी

6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

7. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

8. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

9. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

10. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

11. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

12. तसेच 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहे. नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!