Free Ration Services : मोफत धान्य (Free Ration) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मोफत धान्य घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत सरकारने (Govt) माहिती दिली आहे.

यापुढे आता अंत्योदय रेशन कार्डधारकांना (Antyodaya ration card) मोफत धान्यासोबतच मोफत उपचाराची (Free Health Service) सुविधा दिली जाणार आहे.

अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे

सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून आयुष्मान कार्डसाठी सार्वजनिक सुविधा केंद्रात अर्ज करू शकता.

योगी सरकारने (Yogi Sarkar) म्हटले आहे त्यांनी अंत्योदय रेशनकार्डधारकांची आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.

मोफत उपचार मिळेल

सरकारच्या या निर्णयानंतर तुम्हाला तुमच्या उपचारासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नाहीत. उलट ज्यांची नावे यादीत आहेत त्यांचीच कार्डे बनवली जात आहेत.

आयुष्मान कार्ड कुठे बनवायचे

आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त, सरकारने स्थानिक पातळीवर चालणाऱ्या सार्वजनिक सुविधा केंद्रांवरही आयुष्मान भारत कार्ड बनवण्याची सुविधा सुरू केली आहे.

तुम्हाला तुमचे अंत्योदय रेशन कार्ड या सुविधा केंद्रांवर दाखवावे लागेल. जेणेकरून तुम्ही आयुष्मान भारत कार्डसाठी अर्ज करू शकता. अशीच काहीशी घोषणा यूपी (UP) सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

सरकार सप्टेंबरमध्येही मोफत रेशन देत आहे

उत्तर प्रदेशमध्ये मोफत रेशन योजनेचा सहावा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गरीब कल्याण योजनेचा लाभ घेणारे 15 कोटी लाभार्थी आहेत. ज्यांना शासनाकडून मोफत रेशनची सुविधा दिली जात आहे.