अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होणार आहे.

लोणी येथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. दरम्यान राज्यपाल २७ ऑक्टोबरच्या रात्री विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्रामगृहात मुक्कामी राहणार असल्याचे नियोजन सुरू आहे.

तसेच 28 ऑक्टोबरला राज्यपाल हे राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. जिल्हा दौरा दरम्यानच राज्यपाल आदर्शगाव हिवरेबाजारला ते भेट देणार असून तेथेही त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत.

राज्यपालांच्या प्राथमिक दौऱ्याचं नियोजन प्राप्त झालं असून त्याला अंतिम स्वरूप अद्याप यायचे आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.