अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Heat Wave : गेल्या काही काळापासून वाढलेल्या उष्म्यातून आपेक्षित दिलासा तर मिळाला नाहीच, मात्र पुन्हा एकदा उष्णेची लाट येण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यास उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात ५ व ६ मे रोजी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील हवामान सक्रीय राहण्याची शक्यता आहे. आज व उद्या पुणे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पुढील दिवस, उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ ते ६ मे या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा उत्तर मध्य महाराष्ट्रात येतो. येथील कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.