अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   पीएसआय या पदाची मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी आहे आणि त्याचदिवशी म्हाडाचेदेखील पेपर सुरू होणार आहेत.

यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता होती. यामुळे आता पुन्हा एकदा म्हाडाची परीक्षा लांबणीवर पडली आहे.

म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती.

पण ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख ही म्हाडा विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे. याआधीही ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडाच्या परिक्षेचा पेपर फुटला होता.

त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली होती. कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली होती. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती.