अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आईच्या मित्राने तिच्या मुलीवर देखील डोळा ठेवला.! मात्र, त्या मुलीने त्यास चांगलाच धडा शिकविला. आईच्या मित्राकडून होणाऱ्या या त्रासाबाबत मुलीने आईस सांगितले असता तो चेष्टा करतो आहे.

असे आई म्हणाली. त्यानंतर मुलीने याबाबत वडिलांना कळविले आणि आपल्या आईसह तिच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

ही धक्कादायक घटना संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी परिसरात पतीशी वाद झालेली

४० वर्षीय महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह बाबासाहेब बाबुराव गुंजाळ रा. गुंजाळवाडी याच्यासोबत राहत होती. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असताना

बाबासाहेब गुंजाळ याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने विरोध करत त्याला खडसावले असता तिच्या बहिणीला मारण्याची धमकी त्याने दिली. हा प्रकार आपल्या आईला सांगितला असता आईने चूप राहण्यास सांगितले.

हा प्रकार असह्य झाल्याने पिडीतेने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आई व गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.