Close up of a mature man taking a vaccine in his doctors office

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे . एकीकडे एवढे सगळे सुरु असताना देखील दुसरीकडे मात्र अद्यापही अनेकांनी लसीकरण करून घेतले नसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. नगर जिल्ह्यात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला. असे असतांना अद्यापही जिल्ह्यातील 7 लाख 83 हजार 2880 जणांनी पहिला डोस घेतलेला नाही.

तर 20 लाख 2 हजार 19 नागरिक करोना प्रतिबंधात्मक लसचा दुसरा डोस घेतलेला नाही. लस असूनही ही स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, लस नाही तर प्रवेश नाही, या जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर नगरकर लसीकरणाला कसा प्रतिसाद देतात हे पाहवे लागणार आहे.

जिल्ह्यात 36 लाख लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 28 लाख 20 हजार 320 जणांनी पहिला डोस, तर 16 लाख 1 हजार 581 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

मात्र अजूनही 7 लाख 83 हजार 280 लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. तर 20 लाख 2 हजार नगरकरांचा दुसरा डोस बाकी आहे.

दरम्यान जिल्ह्यात डिसेंबर महिन्यांत 3 तारखेला उच्चांकी 46 हजार 484 लसीकरण झाले होते. तर सर्वात कमी लसीकरण 1 हजार 129 हे 19 डिसेंबरला झालेले आहे. उर्वरित दिवशी जिल्ह्यात दैनदिन सरासरी 22 ते 28 हजार जणांचे लसीकरण होत आहे.