file photo

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मागील भांडणाच्या वादातून एका युवकावर सत्तूरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चांदबीबी महाल परिसरात घडली होती.(Ahmednagar Crime)

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी आदम बाबा बागवान (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे, नगर) याला कोठला परिसरातून अटक केली आहे.

अयाज शब्बीर शेख या युवकाला आदम बागवान, अरबाज शकील सय्यद, शकील ऊर्फ गुलु सय्यद यांनी मारहाण केली होती. सत्तूरने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

अयाज याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील आरोपी बागवान याला सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस अंमलदार रावसाहेब खेडकर,

भगवान गांगर्डे, विक्रांत बालसिंग, अझहरुददीन इस्माईल सय्यद, धर्मराज दहिफळे यांच्या पथकाने कोठला परिसरातून अटक केली.